A.G. JOSHI
A.G. JOSHI Aug 14, 2019

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐 🌞 दिन विशेष इसवी सन २०१९- १४ अॉगष्ट शालिवाहन शक १९४१ विक्रम संवत २०७५ भा. रा. २३ श्रावण (५) १९४१ युगाब्द ५१२१ संवत्सर नाम: विकारी अयन : दक्षिणायण ऋतु : वर्षा मास: श्रावण पक्ष : शुक्ल तिथी : चतुर्दशी (१५.४६) ~ पौर्णिमा वार : बुधवार नक्षत्र : श्रवण राशी : मकर नारळी पौर्णिमा ऋक श्रावणी १८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. १८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश. १९४५: दोन अणुबाँबच्या भयावह संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. १९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक. १९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली. १९४७ः भारताची दुःखद फाळणी होऊन स्वतंत्र पाकिस्तान देश निर्माण झाला जन्मदिवस १९११ : वेदतिरी महाऋषी, भारतीय तत्त्वज्ञानी. १९२५ : जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार. मृत्यूदिन १९८४ : खाशाबा जाधव,  भारतीय कुस्तीगीर. १९८८ : आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक. २०११ शम्मी कपूर, अभिनेता २०१२ विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ।। दास-वाणी ।। चंद्र सूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमंडळें मेघमाळा । ये ब्रह्मांडी नाना कळा । वायोकरितां ।। येकवटलें तें निवडेना । कालवलें तें वेगळें होईना । तैसें हे बेचाड नाना । केवी कळे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १६/०६/१२-१३ या ब्रह्मांडामधील विविध चंद्र सूर्य ग्रहमंडळे नक्षत्रांच्या माळा लाखो वर्षे ठराविक गतीने ठराविक कक्षेमधे फिरत राहातात. हे वायुतत्वाचे कार्य होय. इतकेच नव्हे तर पृथ्वीवर बरसणारे ढगांचे थवेच्या थवे वायूमुळेच एकत्र येतात. वायूमुळेच पुढे सरकतात. देहाचे चलन वळण आणि श्वासोच्छ्वास हे वायूचे कार्य. या वायूच्या सामर्थ्याने एकवटलेली पंचमहाभूते आता वेगवेगळी करता येत नाहीत. वायूने कालवलेल्या या पंचीकरणाचे कोडे किंवा गुंता हा समजायला सुद्धा कठीॆणच आहे. कठोर प्रदीर्घ साधनेने क्वचितच काही भाग्यवान साधकांना हा तत्वझाडा साधतो. ते सिद्धच बनतात. वायोस्तवन समास. 🙏 💐💐💐💐💐 🙏

+16 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 3 शेयर

कामेंट्स

A.G. JOSHI Aug 14, 2019
@jayendrashah3 ॥ सुमंगल सुप्रभात शुभ बुधवार॥🙏🙏🌹🌹

A.G. JOSHI Aug 14, 2019
@radhderadhe ॥ राम कृष्ण हरी माऊली सुमंगल सुप्रभात शुभ बुधवार॥🙏🙏🌹🌹

Jayendra Shah Aug 15, 2019
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद.... शुभप्रभात.....

A.G. JOSHI Aug 15, 2019
@jayendrashah3 ॥ सुमंगल सुप्रभात स्वंतत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ गुरुवार ॥

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB