‼️ ११नोहेंबर ‼️ 🚩!! श्रीमत दासबोध !!🚩 🌹दशक -२, समास -७ सत्वगुणलक्षण🌹 देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन | नित्य नेम जप ध्यान | करी तो सत्वगुण ||३६||श्रीराम॥ शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले | योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||श्रीराम॥ सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन | श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||श्रीराम॥ अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निढारले नयन | पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||श्रीराम॥ हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती | आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||श्रीराम॥ 🍁🌺 भावार्थ :-🌺🍁 ♻️⚜️ परब्रह्म प्राप्तीसाठी उपवासाचे व्रत करणे, तांबूलभक्षणासारखी एखादी संवय सोडणे, नित्यनेम, जप-ध्यान करणे, इत्यादि सर्व सत्वगुणलक्षण होय. ♻️⚜️ कोणाला कठोरपणे न बोलणे, अतिनियमितपणाने वागल्यामुळे योगी संतोष पावून कौतुक करतात, हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. ♻️⚜️ अहंकार सांडून निष्कामपणाने कीर्तन करत असताना अष्टसात्विक भावापैकी श्वेद, रोमांच, स्फुरण जागृत होणे, हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. [-“अष्टसात्विक भाव” जागृत होतात तेव्हां असा भक्त विदेही अवस्थेत १]स्तंभित होतो, २] श्वेदयुक्त-घामाघूम होतो,३] रोमांच अनुभवतो, ४]स्वर-भंग अनुभवतो, ५]शरीरकंप अनुभवतो ६] वैवर्ण अनुभवतो म्हणजे शरीर-रंगात बदल अनुभवतो, ७] आनंदाश्रु अनुभवतो, ८] प्रलय अनुभवतो म्हणजे भक्त शुद्ध हरपतो, अर्थात उन्मनी अवस्था अनुभवतो, समाधी अवस्था अनुभवतो. हा कालावधी जास्तजास्त काळ राहावा असं त्या भक्तास वाटत राहतं. तहानभूक हरपलेली ती स्थिती कायम रहावी असंच त्यास वाटत असतं.] ♻️⚜️ अंतःकरणांत भगवंताचे ध्यान करत असता ’निढारले नयन’ अर्थात डोळे पाण्याचे भरून येणे, देहभान हरपणे, हे सर्व सत्वगुण होत. ♻️⚜️ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हरिकथेविषयी अत्यंत प्रेम, जिव्हाळा वाटत असल्यामुळे, कीर्तन संपेपर्यंत त्यात कुठलाही दुसरा विकृतपणाचा विषय मनात सर्वथा येत नाही, ते सत्वगुणामुळेच होय. 🛕अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛕 ‼️जय जय रघुवीर समर्थ ‼️

‼️ ११नोहेंबर ‼️
   
     🚩!! श्रीमत दासबोध !!🚩
  🌹दशक -२, समास -७ सत्वगुणलक्षण🌹
   
  देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन | नित्य नेम जप ध्यान | करी तो सत्वगुण ||३६||श्रीराम॥

शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले | योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||श्रीराम॥

सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन | श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||श्रीराम॥

अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निढारले नयन | पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||श्रीराम॥

हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती | आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||श्रीराम॥

 
     🍁🌺 भावार्थ :-🌺🍁

♻️⚜️
    परब्रह्म प्राप्तीसाठी उपवासाचे व्रत करणे, तांबूलभक्षणासारखी एखादी संवय सोडणे, नित्यनेम, जप-ध्यान करणे, इत्यादि सर्व सत्वगुणलक्षण होय. 

♻️⚜️
     कोणाला कठोरपणे न बोलणे, अतिनियमितपणाने वागल्यामुळे योगी संतोष पावून कौतुक करतात, हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. 
♻️⚜️
     अहंकार सांडून निष्कामपणाने कीर्तन करत असताना अष्टसात्विक भावापैकी श्वेद, रोमांच, स्फुरण जागृत होणे, हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. [-“अष्टसात्विक भाव” जागृत होतात तेव्हां असा भक्त विदेही अवस्थेत १]स्तंभित होतो, २] श्वेदयुक्त-घामाघूम होतो,३] रोमांच अनुभवतो, ४]स्वर-भंग अनुभवतो, ५]शरीरकंप अनुभवतो ६] वैवर्ण अनुभवतो म्हणजे शरीर-रंगात बदल अनुभवतो, ७] आनंदाश्रु अनुभवतो, ८] प्रलय अनुभवतो म्हणजे भक्त शुद्ध हरपतो, अर्थात उन्मनी अवस्था अनुभवतो, समाधी अवस्था अनुभवतो. हा कालावधी जास्तजास्त काळ राहावा असं त्या भक्तास वाटत राहतं. तहानभूक हरपलेली ती स्थिती कायम रहावी असंच त्यास वाटत असतं.] 
♻️⚜️
     अंतःकरणांत भगवंताचे ध्यान करत असता ’निढारले नयन’ अर्थात डोळे पाण्याचे भरून येणे, देहभान हरपणे, हे सर्व सत्वगुण होत. 
♻️⚜️
     सुरुवातीपासून शेवटपर्यंत हरिकथेविषयी अत्यंत प्रेम, जिव्हाळा वाटत असल्यामुळे, कीर्तन संपेपर्यंत त्यात कुठलाही दुसरा विकृतपणाचा विषय मनात सर्वथा येत नाही, ते सत्वगुणामुळेच होय.
    
   🛕अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛕                      
     ‼️जय जय रघुवीर समर्थ ‼️

+3 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 20 शेयर

कामेंट्स

Sunita Car penter Jan 19, 2022

+7 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
KRISHNA Jan 19, 2022

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Alka Sharma Jan 19, 2022

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
Shivsanker Shukla Jan 19, 2022

शुभ बुधवार की शुभ संध्या में मंदिर परिवार के सभी आदरणीय भगवत प्रेमी भाई बहन आप सभी को संध्या की राम राम भगवान गणेश हम आप सभी के जीवन पथ पर अपनी मांगलिक कृपा बनाए रखें आप का हर पल मंगलमय और खुशियों भरा हो मेरे भाई बहन श्री रामचरित मानस के द्वारा यह सिद्ध हुआ एक भाई का रिश्ता भाई से विपत्ति बांटने के लिए होता है परंतु आज समय का परिवर्तन भाई का रिश्ता सिर्फ संपत्ति बांटने तक सीमित रह गया है मेरे भाई बहन दुख का विषय है कुछ भाई तो आज ऐसे भी हैं कि संपत्ति बांटना भी उचित नहीं समझते सारी संपत्ति के स्वयं दावेदार बनना चाहते हैं परिस्थितियां कहां पहुंच चुकी हैं इतिहास साक्षी है परमात्मा श्री राम प्राण त्याग सकते हैं परंतु भरत जैसे भाई का त्याग प्राणों से भी बढ़कर है उधर महात्मा श्री भरत प्रतिज्ञा से बंधे हुए हैं की वनवास की 14 वर्ष की अवधि पूरे होते ही भैया अगर मेरे सन्मुख नहीं होंगे तो यह भरत जलती हुई चिता में कूदकर स्वयं को समाप्त कर लेगा मेरे भाई बहन क्या आज भी भरत जैसा भाई इस दुनिया में होगा

+37 प्रतिक्रिया 12 कॉमेंट्स • 18 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB