🔆 ज्याचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा 🔆 भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके त्या दिवशी खूप आनंदात होते. त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता. त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते. ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले. डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात.... इतक्यात .... अचानक ...विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले. डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले... विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले. जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता. त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता. पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले.... प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला.. रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते. बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत... पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते. सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले. कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले. तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या. त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले. जरा वेळाने ती म्हणाली .. माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का? डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला! ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली. प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती. डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते! काही वेळाने तिची प्रार्थना संपली. डाॅ. नी तिला विचारले ... या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी? देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का? आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात? .... त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली... खोल आवाजात ती म्हणाली ... "माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे... मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.. मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल..." ... पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली ... डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले ... काय बोलावे ते कळेनाच त्यांना ... त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला ... कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही.... गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला ... याच घरात आसरा घ्यावा लागला ... आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती .... ... काय अद्भूत् ..चमत्कारच जसा .. काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...! ... सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी .... देवावरची अपार निष्ठा ! ... कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!! या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण देव आहे एवढे मात्र नक्की🙏🙏☺

🔆 ज्याचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा 🔆

भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके त्या दिवशी खूप आनंदात होते.

त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता. 

त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते.

ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले. 

डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात....इतक्यात ....


अचानक ...विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले.


डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले...

विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे. 

त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.

त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता.

पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले....


प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला..

रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते.
बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत...


पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते.


सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले. 

कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला.


एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले.

तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.

त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले.

जरा वेळाने ती म्हणाली ..

माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का?


डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली.

प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती. 

डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!


काही वेळाने तिची प्रार्थना संपली. 

डाॅ. नी तिला विचारले ...

या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी?

देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का?

आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात?

....


त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली...

खोल आवाजात ती म्हणाली ...

"माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे... 
मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत..

मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल..." ...पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली ...


डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले ...
काय बोलावे ते कळेनाच त्यांना ...

त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला ...

कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही....

गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला ...

याच घरात आसरा घ्यावा लागला ...

आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती ....


...

काय अद्भूत् ..चमत्कारच जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...!


...


सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ....


देवावरची अपार निष्ठा !

...


कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!

या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण देव आहे एवढे मात्र नक्की🙏🙏☺

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 52 शेयर
Kalpana.B.R. Jul 30, 2022

+11 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 27 शेयर

_*नियती....*_ _*नियती* कधीच कुणावर अन्याय करत नाही,कधीच नाही.ती फक्त न्यायच करते.स्वतःविषयी अवास्तव कल्पना,इतरांच्या परिस्थितीशी तुलना आणि कसलाही शेंडाबुडखा नसलेला हव्यास यामुळे आपल्याला तो न्यायही अन्यायच वाटू लागतो.नियती ही एखाद्या पिठाच्या गिरणीसारखी आहे.एकीकडून जे कर्म टाकाल,दुसरीकडून त्याचंच पीठ काढून तुमच्या पिशवीत दिलं जातं.रांगेत तुमच्या आधी उभ्या असलेल्या माणसाला स्वच्छ सोनेरी रंगाचं,ताजं गव्हाचं पीठ मिळालं म्हणजे मलाही तेच हवं असा अट्टाहास तुम्ही करता आणि स्वतःच्या कर्माच्या पिशवीत मात्र कण्याच आणल्या आहेत ते सोयिस्करपणे विसरता बरं.जे पेराल तेच उगवेल म्हणून आत्ताचं क्रियमाण (वर्तमान कर्म )सुधारा तेच उद्यासाठीचं पूर्वसंचित आहे.*कितीही तुलना केलीत तरी तुमच्या नशिबात केवळ तुमच्याच हक्काचं आणि संचिताचं पीठ दिलं जातं हे विसरु नका....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 33 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 16 शेयर
Kalpana.B.R. Jul 29, 2022

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर
Anna Shinde Jul 29, 2022

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 26 शेयर
Anna Shinde Jul 29, 2022

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 9 शेयर
Anna Shinde Jul 29, 2022

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर

_*श्रावण....*_ _तिन्ही सांजेला तेलाचा दिवा,तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर,दिव्याची आवस म्हणून जाड कणिक,केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल.डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ,हरभरा डाळ,भाजलेले दाणे,फुटाणे,दाण्याचं खमंग कूट,नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड,उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर.जिवतीचा फोटो,कहाण्यांच पुस्तक,स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र,दिव्यांनी सजलेलं देवघर,फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा आघाडा फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन.श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण,भाजणीचे वडे,नारळी भात, नारळाच्या वडया,वालाचं बिरडं,गव्हाची खीर,हारोळ्याचे लाडू,भोपळयाचे घारगे,गाकर,पुरणाची पोळी,पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध.श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी,आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा,शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण,आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा,माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सौवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर,प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण.श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार,श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग,कापसाच्या वस्त्रानं,हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट,गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी.श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं आपल आंगण.श्रावण म्हणजे हिरवा ऋतु या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.कांकणांची किणकीण,काचेचा चुडा,हातावरची मेंदी,जरी काठाच्या साड्या,केसांत जुईचा गजरा,पायी जोडव्यांचा आवाज,गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर,कानांत कुड्या आणि पायांत पैंजण म्हणजेच घरातही भेटणारा,सजवणारा श्रावण.श्रावण म्हणजे आठवणींची सर,श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल,श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या आठवणी करून देणारा सण तर कधी मंगळागौर उजवताना दिलेल्या वाणाची एक गोड आठवण,श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता केलेलं औक्षण,माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी श्रावण म्हणजे देव्हाऱ्यांत समईच्या मंद प्रकाशात दिसणारं प्रसन्न रूप श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस...._ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+5 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 10 शेयर

_*तुका म्हणे सारासार विचार करा उठाउठी !!....*_ _विचाराचा ज्ञान-प्रकियेशी संबंध आहे.यातील तात्विक विचार बाजूला ठेवला तरी विचार नावाचे काहीतरी आपल्या डोक्यात चालू असते.एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे आपण जात असतो आणि अनेकदा अशा विचाराच्या समुद्रात आपण मग्न होत असतो.व्यवहारात या विचारांची उपयुक्तता आपल्याला तपासून पाहावी लागते.योग्य विचार आपण निवडू शकलो तर आपल्या जगण्यात अडथळे येत नाहीत.प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारावे की;या पृथ्वीवर आपण जीव धारण करण्याचे प्रयोजन काय असावे?जर असेल आणि काही कार्य करायचे असेल तर,आपण आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आपल्या कमकुवतपणा आणि नातेसंबंधांची काळजी घ्यायला हवी.यामुळे कदाचित जीवनातील कर्तव्यांचे ज्ञान होईल आणि आपल्या सर्व कार्यात मार्ग दिसतील.तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्यात तुमची आवड आणि समर्पण आसल्याशिवाय ते काम करू नका.याचा परिणाम असा होईल की अकीर्ति,अपमान तुमच्यापासून कायम दूर राहतील,पश्चात्ताप तुमच्या जवळ येणार नाही,तुम्हाला शोक करावा लागणार नाही.जोपर्यंत तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत तोंड उघडू नका.जो अविचारी आहे तो आपल्या जिभेवर ताबा ठेवू शकत नाही,मन जे ऐकेल ते म्हणतो आणि मग आपल्याच मूर्खपणाच्या बोलण्यातून भांडणात अडकतो.जो माणूस घाईघाईने धावतो आणि पलीकडे काय आहे याचा विचार न करता किंवा न पाहता भिंतीवर चढतो,तो त्याच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात पडू शकतो.परिणामांचा विचार न करता काही काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही असेच होते.म्हणून *विचारांच्या हाकेला मान द्या.त्याचे शब्द शहाणपणाचे शब्द आहेत,त्याने दाखवलेल्या मार्गांनी तुमचे रक्षण होईल आणि शेवटी तुम्हाला सत्याची भेट होईल....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+6 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 24 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB