*संत जनाबाई* संत जनाबाई निधन (१५ मे ,१३५०) गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका शूद्र जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्‍या, पंढरपुरात वास्तव्य करणार्‍या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे. अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली होती. नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. तेंव्हा जनाबाई म्हणतात झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।। पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां टाकी दुरी।। ऐसा भक्तिसी भुलला। नीच कामें करूं लागला।। जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होंऊ तुला।। वारकरी सांप्रदायामध्ये संत नामदेवाची दासी म्हणून आयुष्यभर संत जनाबाई राहिल्या .त्यांनी जवळपास ३५० रचना केल्या त्या पैकी काही नामदेवांच्या समजल्या जातात.त्यांचे म्हणणे होते की पुनर्जन्म कुठलाही असुदे तो पंढरपुरात असला पाहिजे व त्या जन्माला आलेल्या जीवाला पांडुरंगाची व संत नामदेवांची सेवा करता आली पाहिजे असे त्यांना वाटत असे म्हणून त्या म्हणतात देवा देई गर्भवास। तरीच पुरेच माझी आस।। परी हे देखा रे पंढरी। सेवा नाम्याचे द्वारी।। करी पक्षी का सुकर। श्वान,श्वापद मार्जार।। ऐसा होत माझे मनी। म्हणे नामयाची जनी।। जनाबाईं बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. तिचा जिवलग विठ्ठल दिवसभर काम करून दमलेल्या जनाबाईशी गुजगोष्टी करायला येत असे.एके दिवशी परत जाताना विठ्ठल तिच्या घरी त्याचे पदक विसरला आणि ते पदक जनाबाईने चोरले असा आळ तिच्यावर घेऊन तिला सुळावर चढवायची शिक्षा फर्मावली जाते, चंद्रभागेच्या वाळवंटात सूळ उभा केला जातो.जनाबाई विठ्ठलाचा धावा करते आणि त्या सुळाचे पाणी होते. या कथेवर प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांनी *माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी* हे सुंदर गाणे लिहिले आणि माणिक वर्मानी ते गायले आहे. जनाबाईने लिहिलेल्या अभंगांपैकी काही अभंग सोबत दिले आहेत. जनाबाई थोरच आणि ते अभंग सुंदर संगीतामध्ये सजवणारे संगीतकार आणि गाऊन त्यांना चिरंतन करणारे गायक / गायिका देखील तेव्हडेच तोलामोलाचे . भारतरत्न पं.भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी,किशोरी आमोणकर,आशा भोसले,अनुराधा पौडवाल यांनी संत जनाबाईंचे गायलेल्या अभंगांपैकी थोडे सोबत देतो आहे. १) संत भार पंढरीत २) दळीता कांडिता ३) येग येग विठाबाई ४) जनी म्हणे पांडुरंगा ५) धरिला पंढरीचा चोर ६) नाम विठोबाचे घ्यावे ७.विठू माझा लेकुरवाळा वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घातलेल्या संत परंपरेतील थोर जनाबाईंना विनम्र अभिवादन. प्रसाद जोग.सांगली. ९४२२०४११५० संदर्भ : डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर यांनी लिहिलेले संत जनाबाई हे पुस्तक

+3 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 24 शेयर

एकदा एक पक्षी चोचीने समुद्रातील पाणी बाहेर काढत होता. दुसऱ्या पक्षाने विचारलं - भाऊ तू हे काय करतो आहेस ? पहिला पक्षी बोलला- या समुद्राने माझी पिल्लं बुडवलीत. आता तर मी या समुद्राला सुकवूनच टाकतो.‌ हे ऐकून दुसरा पक्षी बोलला- अरे भावड्या तुझ्याकडनं कसा काय सुकेल समुद्र ? तू एवढासा जीव अन् समुद्र एवढा विशाल. तुझं तर संपूर्ण आयुष्य अपूरे पडेल यासाठी. तर पहिला पक्षी बोलला - दादा! द्यायची तर साथ दे, फक्त सल्ले नकोत. हे ऐकून दुसरा पक्षी पण साथ द्यायला लागला. असे हजारो पक्षी येत गेले व दुसऱ्यांना सांगत गेले की , सल्ले नकोत साथ पाहिजे. हे पाहून विष्णुदेवाचं वाहन गरुड पण ह्या कामासाठी जायला निघाला. विष्णु देव म्हणाले अरे तू कुठे चाललास ? तू गेलास तर माझं काम खोळंबेल. अन् तसंही तुम्हा सर्व पक्ष्यांकडून समुद्र काही सुकला पण जाणार नाहीये. गरुड बोलला - देवा सल्ला नको साथ द्या. मग काय, हे ऐकून विष्णुदेव पण समुद्र सुकवायसाठी पुढे आले. विष्णु देवाला पाहून समुद्र घाबरला आणि त्याने त्या पक्षाची पिल्लं परत केली. ह्या संकट समयी आपल्या देशाला देखील आपला सल्ला नको साथ हवी आहे. आज रोजी सरकारवर नुसती टीका करणारे नकोत तर समाजासोबत उभे राहून त्यांची सेवा करणाऱ्या लोकांची गरज आहे. त्यामुळे दादांनो , सल्ले नकोत साथ द्या. 🙏 जेव्हा साथ देईल संपूर्ण भारत, तेव्हा पुन्हा आनंदी होईल भारत.... ❤️

+5 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 27 शेयर

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।* *🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩* *🌸 प्रवचने :: १५ मे 🌸* *कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे .* ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग, खर्च थोडा कमी करण्याचा यत्‍न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरूर आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तर्‍हेने देहाला दुखापत केली, तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल, आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील; पण मन दुखविण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे; कारण, भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यांत 'मी मन आहे' असे सांगितले आहे. सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य असे म्हणाला की, मी एक सत्य तेवढेच जाणतो, आणि सत्य बोलताना आई, बाप, माणसे, देव, गुरू वगैरे कुणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावे ? एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील, तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे ? चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला, त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का ? सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा, एका बापाला चार मुलगे आहेत; त्या चारांपैकी एकाला गोड आवडते, दुसर्‍याला आंबट आवडते, तिसर्‍याला तिखट आवडते, आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुचि वैचित्र्यामुळे, जर ते भांडू लागले, तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचे असेल, तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम; आणि पुढे प्रेम वाढविण्याकरिता, ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत, त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम; म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून, आपण सर्व बंधू आहोत ही जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे, या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले, तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. *१३६. साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणार्‍याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे.* *।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

+12 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 17 शेयर
@gauravaashu May 15, 2021

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 21 शेयर
Ravindra May 15, 2021

+5 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 3 शेयर
tanvi🍁🍁 May 15, 2021

+29 प्रतिक्रिया 7 कॉमेंट्स • 95 शेयर

जोपर्यंत मी देह आहे ही भावना आहे तोपर्यंत संचित, प्रारब्ध, क्रियमाण याला महत्व आहे. मी देह नाही ही निष्ठा एकदा पक्की झाली की सर्व व्यर्थ आहे, एखाद्या स्वप्नातल्या देखाव्या प्रमाणे आहे, हे माणसाला समजते. ह्या संबंधात पुराणांमध्ये एक कथा येते. एकदा जनक राजाला एक स्वप्न पडते. त्या स्वप्नांमध्ये त्याला असं दिसत की सर्वत्र खूप दुष्काळ पडला आहे, खायला अन्नधान्य नाही, आणि सर्व लोक भिक्षा मागून जीवन जगत आहेत. तो ही असाच एक हिन दिन भिकारीच आहे. त्याला अस दिसत की एका ठिकाणी एक दानशूर माणूस सर्व भिकाऱ्यांना पुरी भाजी वगैरे देत आहे. जनक राजा सुद्धा त्या तिकडे धावतो व त्या ओळीत उभा रहातो. त्याची वेळ आल्यावर त्याच्या हातावर सुद्धा दोन पुऱ्या व थोडी भाजी पडते. आता कुठेतरी बसून ती खावी असा विचार मनात असतानाच एक दांडगा माणूस त्याच्यावर झडप घालतो आणि त्याची पुरी भाजी पळवतो. जनक राजा त्याच्यामागे जीवाच्या आकांताने धावत असतो आणि धावता धावता ठेच लागून खाली पडतो व जागा होतो. जागा झाल्यावर त्याच्या लक्षात येतं हे सगळं केवळ स्वप्नच होतो व तो फार मोठा वैभवशाली राजाच आहे. हे जाणल्यावर त्या स्वप्नातल्या सुखदुःखांनी तो प्रभावीत होईल का? किंवा आणखी एक उदाहरण सांगतो. समजा नाटकामध्ये किंवा सिरीयल मध्ये एखादा नट एखादी भूमिका करत असतो. तो त्या भूमिकेशी आणि त्यातल्या सुखदुःखांची इतका समरस झाला आहे अस दाखवतो की ती त्याची स्वतःचीच सुख दुःख आहेत असं निदान आपल्याला तरी वाटत. पण त्याच्या दृष्टीने ती फक्त भूमिका असते आणि ती त्या भूमिकेतली सुखदुःख असतात. ती सुखदुःख तो स्वत:च भोगत आहे अस तो आपल्याला दाखवत असला तरी त्यानी तो स्वतः प्रभावीत मात्र होत नाही. त्याच्या दृष्टिने ती केवळ भूमिका असते. ती संपल्याबरोबर तो रंगभूमीवरून खाली उतरतो व त्याच्या नेहमीच्या जीवनात परत जातो. तसंच हे विश्व सुद्धा एक मोठी रंगभूमी आहे आणि आपण सर्वजण त्यामधली केवळ पात्र आहोत. आपलं आजचं जीवन हे त्या नाटकातल्या भूमिके सारख आहे याची सतत जाणीव ठेवली तर आपली भूमिका आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करू पण त्यातल्या सुखदुःखांनी आपण व्यथित होणार नाही हे खर आहे ना. तसच ह्या जीवनाकडे बघा म्हणजे तुम्ही तुमच्या आजच्या सुखा दुःखाने विचालीत होणार नाही. अस जिवन जगतात त्यांनाच लोक संत, महात्मा अस म्हणतात.

0 कॉमेंट्स • 1 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
Kalpana .B .R May 15, 2021

+12 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

+18 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 16 शेयर